महाराष्ट्रात ३८ साखर कारखाने सुरु, पाच दिवसांत सात लाख टन उसाचे गाळप

पुणे : राज्यात ३८ साखर कारखान्यांची धुराडी पेटली असून जवळपास सात लाख टन ऊस गाळप करण्यात आला आहे. गाळपात अवघ्या पाच दिवसांत सोलापूर विभागाने आघाडी घेतली आहे. सात लाख टनांपैकी दोन लाख टन सोलापूर विभागात गाळप झाले आहे. त्यापासून १.१८ लाख क्विंटल साखर उत्पादित करण्यात आली आहे. पहिल्या आठवड्यात सर्वाधिक उतारा छत्रपती संभाजीनगरमधील कारखान्यांचा असून तो ६.७३ टक्के आहे. या विभागात ऊस गाळप मात्र ५० हजार टनांपर्यंत झालेले आहे.

राज्यात पहिल्या टप्प्यात १६ सहकारी व २२ खासगी साखर कारखान्यांनी ऊस खरेदी सुरू केली आहे. कोल्हापूर, पुणे, सोलापूर व नांदेड विभागांतील ३१ साखर कारखान्यांनी आतापर्यंत विभागातून प्रत्येकी सव्वा लाख टनाहून अधिक ऊस गाळप केले आहे. साखर आयुक्तालयातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, १५ नोव्हेंबरला साखर कारखान्यांची धुराडी पेटल्यानंतर पाच दिवसांत २० नोव्हेंबरपर्यंत ३८ कारखान्यांनी ६.७८ लाख टनांहून अधिक ऊस गाळला आहे. त्यापासून ३.८७ लाख क्विंटल साखर तयार केली आहे. पहिल्या टप्प्यात उतारा केवळ ५.७१ टक्के मिळत असून पुढे तो वाढण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here