सोलापूर : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात तीन लाख ८० हजार ५३५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून तीन लाख ८४ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. हंगामाच्या अखेरचे उसाचे बिल प्रती टन २७०१ रुपये ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या संबंधित बँका, पतसंस्थांमधील खात्यांमध्ये वर्ग केले आहेत, कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी ही माहिती दिली.
अध्यक्ष पाटील म्हणाले की, हंगामातील उसाच्या वाढीकरिता कार्यक्षेत्रात समाधानकारक पाऊस नसल्याने, पाण्याच्या गंभीर टंचाईमुळे ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांनी आमच्या संचालक मंडळावर विश्वास ठेवून ऊस पुरवठा केला. बिले वेळेत देण्याचे काम संचालक मंडळाने केले. त्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक, भगीरथ भालके, प्रा. शिवाजीराव काळुंगे, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, जिजामाता पतसंस्थेचे रामकृष्ण नागणे आदींसह माजी अध्यक्ष, संचालकांसह सभासदांचे सहकार्य मिळाले. यावेळी उपाध्यक्ष तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र पाटील, प्र. कार्यकारी संचालक रमेश जायभाय आदी उपस्थित होते.