फरीदाबाद : गौतम बुद्ध विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ऊस पिकाच्या गोडवा वाढविण्यासाठी ड्रोनची मदत घेतली आहे. गुणवत्ताधाक पिकासाठी कधी लागण करायची याचे मार्गदर्शनही केले जाईल. संशोधक विद्यार्थ्यांच्या टीमने याचे प्रोटोटाइप तयार केले आहे. इलेक्ट्रॉनिक तथा माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून सॉफ्टवेअर टेक्नॉल़जी पार्क ऑफ इंडियामध्ये (एसटीपीआय) या प्रोजेक्टची निवड झाली आहे. गौतम बुद्ध विद्यापीठात दीड महिन्यापुर्वी सुरू झालेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन ड्रोन टेक्नॉलॉजीच्या (सीएईडीटी) विद्यार्थ्यांच्या संशोधन पथकाने ऊस शेतीला बळ मिळेल असे प्रयत्न सुरू केले आहेत.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सीएईडीटीचे को आर्डिनेटर अँड कन्व्हेनर डॉ. नवेद रिजवी यांच्या मार्गदर्शनाखाली मणिकांत पांडे (सॉफ्टवेयर), सौरभ सैनी (हार्डवेअर), सुविज्ञ पांडे (बॅटरी सिस्टम) या टीमने प्रोटोटाइप तयार केला आहे. त्याला असलेल्या मल्टी सॅक्ट्रल कॅमेरे आणि हायपर स्पेक्ट्रल कॅमेऱ्यांच्या मदतीने ऊस पिकांचे ड्रोनने मॅपिंग केले जाईल. विद्यार्थ्यांनी ड्रोनची बॅटरी क्षमता वाढवणे आणि वजन घटविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विद्यापीठाच्या सात प्रोजेक्टवर ४० विद्यार्थी आणि प्राध्यापकांची टीम काम करीत आहे. एसटीपीआयकडून देशभरातील १०० कृषी प्रोजेक्टवर काम सुरू आहे. त्यातील १० शुगररेन फार्मिंग प्रोजेक्टमध्ये या प्रोजेक्टची निवड करण्यात आली आहे. असे जीबीयूचे कुलपती प्रा. आर. के. सिन्हा यांनी सांगितले.