लातूर : उजना येथील सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या १२ व्या गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली. सिद्धी शुगरने २०२३- २४ या हंगामात ४ लाख ९४ हजार मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब जाधव होते. सिध्दी शुगरचे चेअरमन, आमदार बाबासाहेब पाटील यांनी यावेळी गाळप हंगाम यशस्वी केल्याबद्दल ऊसतोड कामगार, हार्वेस्टर ठेकेदार, शेतकरी, कर्मचारी व कामगार यांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमात आजाराने मृत झालेल्या शेकडे विश्वनाथ बब्रुवान यांच्या कुटूंबास कर्मचाऱ्यांच्यावतीने ३ लाख ८४ हजार १९७ रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. कपिल लव्हराळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव, व्हा. प्रेसिडेंट पी. जी. व्होनराव, संचालक सुरज पाटील, जनरल मॅनेजर पी. एल. बी. एम. कावलगुडेकर, डिस्टीलरी मॅनेजर एस. बी. शिंदे, ऊस विकास अधिकारी यशवंतराव टाळे, धनराज चव्हाण, इलेक्ट्रिकल सप्लायर झगडे, तालुक्यातील उन्नी- जांबचे सरपंच मनोहरराव देवकते, चंद्रकांत गंगथडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.