उस्मानाबादमध्ये आगीत ४० एकरातील ऊस जळून खाक

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ऊसाच्या शेतांवरून जाणाऱ्या अतिउच्च दाबाच्या वीज वाहिनींतील ठिणगीमुळे पसरलेल्या आगीत ४० एकर ऊस जळून खाक झाला. जिल्ह्यातल कळम तालुक्यातील दोन गावांत ही घटना घटली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मंगळवारी रात्री आग लागली. ती खूप कमी वेळात पसरली. स्थानिक लोकांनी महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीला (एमएसईडीसीएल) आणि ट्रान्समिशन कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. शिरढोण पोलिसांनी याबाबतची तक्रार नोंदवून घेऊन तपास सुरू केला आहे. बुधवारी नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. १० एकर क्षेत्रातील ऊस हिंगणगाव येथे जळाला. तर दभा गावातील ३० एकरातील ऊसाचा एकाचवेळी आग लागली. या शेतकऱ्यांचे सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here