ब्राझीलच्या राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गेल्या 24 तासात 43,773 नवे कोरोना रुग्ण आढळल्याने आता कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 4,041,638 झाली आहे. या कालवधीमध्ये मरणार्यांची संख्या 834 ने वाढून 124,614 इतकी झाली आहे.
बर्या झालेल्या रुग्णांची संख्या 3,247,610 पर्यंत पोचली आहे. संयुक्त राज्य अमेरिकेनंतर कोरोनाच्या बाबतीत ब्राझील दुसर्या स्थानावर आहे. आणि भारत तिसर्या स्थानावर आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने 11 मार्च ला कोरोनाच्या प्रकोपाला महामारी घोषित केले होते. आतापर्यंत जॉन्स हॉपकिन्स विश्वविद्यालयानुसार, 26.1 मिलियन पेक्षा अधिक लोक कोरोनाग्रस्त आढळले आहेत. आणि संपूर्ण जगात 865,000 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यु झाला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.