संबलपूरमध्ये इथेनॉल युनिट उभारणीचे ४० टक्के काम पूर्ण

संबलपूर : संबलपूर बायोफ्युएल्स ओडिशातील संबलपूर जिल्ह्यातील मानेस्वर तालुक्यात १०० केएलपीडी क्षमतेसह एक धान्यावर आधारित इथेनॉल युनिट स्थापन करणार आहे. आतापर्यंत या प्रोजेक्टचे जवळपास ४० टक्के काम पूर्ण झाले आहे.

याबाबत प्रोजेक्ट्स टुडेमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हे युनिट १४.८३ एकर जमिनीवर उभारले जाईल आणि यामध्ये तीन मेगावॅट बगॅसवर आधारित वीज युनिटचाही समावेश असेल. या युनिटमुळे जवळपास १६१ लोकांना रोजगार मिळणार आहे. तज्ज्ञ मुल्यांकन समितीने (ईएसी) मार्च २०२२ मध्ये या योजनेस मंजुरी दिली आहे. याशिवाय संबलपूर बायो फ्युएल्सला एप्रिल २०२२ मध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून (एमओईएफ आणि सीसी) पर्यावरणीय मंजुरी मिळाली आहे. नव्या अपडेटनुसार, कंपनीला डिसेंबर २०२३ पर्यंत योजना पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here