नवी दिल्ली : कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या २४ तासात देशातील कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात नवे ४ लाख १ हजार ७८ रुग्ण आढळले आहेत. तर ४१८७ जणांचा मृत्यू झाला आहे.
यासोबतच देशातील एकूण संक्रमितांची संख्या २ कोटी १८ लाख ९२ हजार ६७६ झाली आहे. तर मृतांची संख्या २ लाख ३८ हजार २७० झाली आहे. तर कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत ७८ हजार २८२ ची वाढ झाली आहे. त्यानंतर सक्रिय रुग्णसंख्या ३७ लाख २३ हजार ४४६ झाली आहे. शुक्रवार ते शनिवार सकाळपर्यंतची ही आकडेवारी आहे.
सलग तिसऱ्या दिवशी नव्या संक्रमित कोरोना रुग्णांची संख्या ४ लाख झाली आहे. यापूर्वी शुक्रवारी ४१४१८८ तर गुरुवारी ४१२२६२ नवे रुग्ण आढळले होते. गेल्या २४ तासात ३ लाख १८ हजार ६०९ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे आता १ कोटी ७९ लाक ३० हजार ९६० जण पूर्णपणे बरे झाले आहेत.
लसीकरण अभियानातून कोरोनाविरोधातील लढाई सुरू आहे. गेल्या २४ तासात देशात २३ लाख जणांना कोरोना विरोधी लस देण्यात आली आहे. आतापर्यंत १६,७३,४६,५४४ जणांना लस दिली आहे. तर गेल्या २४ तासात २२,९७,२५७ जणांना लस मिळाली आहे.