‘ओंकार समूहा’चे ४२ लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट : अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील

पुणे : ओंकार साखर कारखाना परिवाराच्या वतीने चांदापुरी (सोलापूर), अंबुलगा (लातुर), राधानगरी (कोल्हापूर), व हिरडगाव (नगर) या चार साखर कारखान्यांच्या माध्यमातून येत्या गळीत हंगामात ४२ लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी दिली. ओंकार साखर कारखाना युनिटच्या औंध (पुणे) येथील कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोत्रे – पाटील यांनी म्हणाले की, चारही कारखान्याच्या युनिटमधील गळीत हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ऊस तोड मजूर व वाहतूक यंत्रणेशी करार करण्यात आले आहेत. कारखान्याने नेहमीच शेतकरी व कामगार हिताचे निर्णय घेतले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही ऊस उत्पादक शेतकरी व वाहतूकदरांची बिले वेळेत दिली जातील.

चांदापुरी युनिटच्या उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांची कामे, गाळप क्षमतेत वाढ, इथेनॉल व वीज प्रकल्प, कंपोस्ट खत, पेट्रोल पंप यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. येत्या हंगामात हे प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहितीही बोत्रे-पाटील यांनी दिली. यावेळी विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, बडेकर ग्रुपचे प्रवीण बडेकर, दिलीप मोकाशी, राजेंद्र कोरेकर, दिनेश दरेकर, लोणी काळभोर सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब काळभोर, ओंकार कारखान्याच्या संचालिका रेखा बोत्रे-पाटील, प्रशांत बोत्रे-पाटील, डॉ. गौरी बोत्रे पाटील, ओमराजे बोत्रे- पाटील, बी.आर. वाघमोडे, बी.पी. मोरे, आर.टी.यादव, महेश पोरे, सागर मार्तंडे, किरण चव्हाण, नानासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here