परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला असून यावर्षीच्या चालू गळीत हंगामामध्ये दोन्ही जिल्ह्यातील तब्बल १२ साखर कारखान्यांनी ४३ लाख ८७ हजार ६९४ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४३ लाख ३४ हजार २२० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. यंदा कारखान्यांचा गाळप हंगाम नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू झाला होता.
परभणी जिल्ह्यातील रेणुका शुगर देवनांद्रा कारखान्याने १ लाख ५९ हजार ६९१ मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून १ लाख ७८ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. त्यासोबतच लक्ष्मी नरसिंह कारखान्याने ३ लाख ५३ हजार ७८५ मीटर ऊसाचे गाळप करून ३ लाख ५८ हजार ६५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. योगेश्वरी शुगर साखर कारखान्याने २ लाख १३ हजार ३१९ मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून २ लाख १२ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. गंगाखेड शुगर कारखान्याने ६ लाख ७२ हजार ६९० मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून ६ लाख ८३ हजार ३ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. ट्वेन्टीवन शुगर सायखेडा कारखान्याने ७ लाख १० हजार ९०३ मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून ५ लाख ९७ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
पूर्णा तालुक्यातील बळीराजा शुगर कारखान्याने ५ लाख ७१ हजार ७७३ मॅट्रिक टन ऊसाचे गाळप करून ६ लाख ३३ हजार ५५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तुळजाभवानी शुगर आडगाव दराडे कारखान्याने १ लाखाची ६० हजार ७९६ मे.टन गाळप करून १ लाख ६० हजार १०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. हिंगोली जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण सहकारी डोंगरकडा कारखान्याने २ लाख २३ हजार ८७० मेट्रिक टन गाळप करून २ लाख १५ हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. त्यासोबतच पूर्णा सहकारी साखर कारखाने आणि ३ लाख ९९ हजार ४४७ मे. टन ऊसाचे गाळप करून ३ लाख ९१ हजार ८०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
औंढा तालुक्यातील कपिलेश्वर शुगर कारखान्याने ३ लाख ५३ हजार ५२७ मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून ३ लाख ६० हजार ६०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. टोकाई साखर कारखान्याने १ लाख २३ हजार २७२ मे. टन ऊसाचे गाळ करून १ लाख २५ हजार १०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कळमनुरी तालुक्यातील शिरूर वाकोडी या कारखान्याने ४ लाख २५ हजार ७७३ मे. टन ऊसाचे गाळप करून ४ लाख १७हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. दोन्ही जिल्ह्यातील मिळून साखर कारखान्यानी आतापर्यंत ४३ लाख ८७हजार ६९४ मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून त्यापासून ४३ लाख ३४ हजार २०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.