पुणे : महाराष्ट्रात गाळप हंगाम जोरात सुरु असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात साखर कारखान्यांनी राज्याचे राज्यपाल बीएस कोश्यारी यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात ऊस गाळप सुरु केले आहे. राज्यपाल यांनी 22 नोव्हेंबर ला अधिकृतपणे गाळप हंगाम सुरु करण्यास परवानगी दिली होती.
महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या मतानुसार, 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत 43 साखर कारखान्यांनी ऊस गाळपाला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये 20 सहकारी आणि 23 खाजगी कारखाने आहेत. आतापर्यंत साखर कारखान्यांद्वारा 9.04 लाख टन ऊस गाळप करुन 7.38 रिकव्हरी दरानुसार 6.67 लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे.
साखर हंगाम 2019-2020 साठी 162 कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केला होता. 27 नोव्हेंबर पर्यंत 125 कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले होते.
साखर हंगाम 2018-2019 मध्ये एकूण 195 साखर कारखान्यांनी गाळपामध्ये भाग घेतला होता आणि 951.79 लाख टन ऊस गाळप करुन 11.26 टक्के रिकव्हरी दरानुसार 107.19 लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. या हंगामात, राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.