रुडकी : शेतकऱ्यांना उसाची बिले देण्यात लक्सर साखर कारखाना जिल्ह्यातील उर्वरीत दोन कारखान्यांपेक्षा अग्रेसर आहे. लक्सर साखर कारखान्याने या हंगामात ११ नोव्हेंबर रोजी गाळप सुरू केले. त्यानंतर कारखाना प्रशासनाने दोन वेळा ११ ते ३० नोव्हेंबरपर्यंतची ऊस बिले ऊस समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाठवली आहेत.
याबाबत कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक अजय कुमार खंडेलवाल यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी कारखाना प्रशासनाने १ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीतील एकूण ४४.०८ कोटी रुपयांचा धनादेश ऊस समित्यांच्या नावे दिले आहेत. लक्सर ऊस समितीचे प्रभारी सचिव सूरजभान सिंह यांनी धनादेश मिळाले असल्याचे सांगितले. ते म्हणाले, शेतकऱ्यांची बँकनिहाय खाती तपासली जात आहेत. लवकरच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा केले जातील.