मैनपुरी, उत्तर प्रदेश: अंत्योदय कार्डधारकांना आता धान्यासोबत साखरही मिळणार आहे. यासाठी सरकारने जिल्हा स्तरांवर पुरवठादारांना साखरेचे वितरणही केले आहे. फेब्रुवारी महिन्यात याचे वितरण केले जाणार आहे. रेशन कार्डधारकांना एकाचवेळी तीन महिन्यांची साखर दिली जाणार आहे. यासाठी त्यांना ठराविक दर आकारला जाईल.
जिल्ह्यामध्ये ४५६२७ अंत्योदय रेशनकार्ड धारक आहेत. पाच फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या धान्य वितरणावेळी त्यांना प्रति कार्ड एक किलो साखर १९ रुपये दराने दिली जाणार आहे. याचबरोबर त्यांना फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल अशा तीन महिन्यांची तीन किलो साखर दिली जाईल. पाच फेब्रुवारीपासून याचे वितरण सुरू होणार असून याबाबत सर्व वितरकांना आदेश देण्यात आले आहे.
याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यू. आर. खान म्हणाले, पाच फेब्रुवारीपासून अंत्योदय रेशनकार्ड धारकांना तीन किलो साखरेचे वितरण होईल. तीन महिन्यांची साखर एकत्रित मिळेल. यासाठी प्रतिकिलो १८ रुपये दर आकारला जाणार आहे.