खुल्या बाजारातील विक्री योजने अंतर्गत (ओएमएसएस, डी) तिसरा ई-लिलाव 22.02.2023 रोजी आयोजित करण्यात आला होता. देशभरातील एफसीआयच्या 23 विभागातील 620 गोदामांमधला साठा यासाठी उपलब्ध करण्यात आला. एकूण 11.79 एलएमटी गहू उपलब्ध करण्यात आला तर 5.07 एलएमटी गव्हाचा लिलाव करण्यात आला.
अखिल भारतीय सरासरी राखीव किंमत प्रति क्विंटल 2138.12 रुपये होती त्याच्या तुलनेत प्रति क्विंटल 2172.08 रुपये या अखिल भारतीय सरासरी विक्री दराने विक्री झाली.
एकूण विकल्या गेलेल्या गव्हापैकी 1.39 एमएलटीची विक्री हरियाणा, पंजाब आणि मध्य प्रदेशात झाली. तिथे राखीव किंमतीची सरासरी प्रति क्विंटल 2135.35 रुपये आणि सरासरी विक्री किंमत प्रति क्विंटल 2148.32 रुपये होती. उर्वरित देशात (हरियाणा, पंजाब आणि मध्य प्रदेश व्यतिरिक्त इतर राज्ये) 3.68 एमएलटी विक्री झाली. तिथे राखीव किंमतीची सरासरी प्रति क्विंटल 2139.16 रुपये होती आणि सरासरी विक्री किंमत प्रति क्विंटल 2181.08 रुपये होती. बाजार स्थिर झाला असून सरासरी प्रति क्विंटल 2200 रुपयांच्या खाली असल्याचे एकूण किमतीचा कल सूचित करतो. अशा प्रकारे, गव्हाच्या उपलब्धतेमुळे एकूणच गव्हाच्या किमतीत घट झाल्याचे अपेक्षित परिणाम दिसून येत आहेत.
दिल्ली, हरियाणा, तामिळनाडू आणि तेलंगणा या चार राज्यांमध्ये, उपलब्ध केलेल्या गव्हापैकी बोलीदारांनी 100% खरेदी केली आणि आणखी पाच राज्यांमध्ये, उपलब्ध केलेल्या 90% पेक्षा जास्त साठा बोलीदारांनी खरेदी केला.
तिसऱ्या ई-लिलावात 1086.1 कोटी रुपये मिळाले.
चौथा ई-लिलाव 1 मार्च 2023 रोजी होणार आहे.