नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळातही देशात साखर विक्रीत वाढ झाल्याची नोंद झाली आहे. साखर कारखान्यांनी दिलेली माहिती आणि इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या अंदाजानुसार, मे २०२१ मध्ये एकूण विक्री २२.३५ लाख टन झाली आहे. तर या महिन्यातील साखर विक्रीचा कोटा २२ लाख टन होता. सरकारने दिलेल्या १६९ लाख टन देशांतर्गत साखर विक्री कोट्याच्या तुलनेत मे २०२१ मध्ये चालू हंगामातील एकूण साखर विक्री १७४.९६ लाख टन होण्याचा अंदाज आहे. तर साखर विक्रीचा तोटा १६१ लाख टन मंजुर होता.
गेल्या वर्षी या कालावधीत साखर विक्री १६६.४० लाख टन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर विक्री कोटा १६१ लाख टन होता. म्हणजेच चालू वर्षात मे २०२१ पर्यंत साखर विक्री ८.५६ लाख टन झाली. गेल्या वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत ही साखर विक्री ५ टक्क्यांनी अधिक आहे.
बाजारपेठेत मात्र, साखरेच्या मागणीत गेल्या काही महिन्यांपासून घसरण झाल्याचा गैरसमज आहे. मार्च २०२१ मध्ये साखर कारखान्यांनी २२.३४ टन साखर विक्री केली होती हे विशेष. अशाच पद्धतीने एप्रिल २०२१ मध्ये २३.१३ लाख टन आणि आता मे २०२१ मध्ये २२.३५ लाख टन विक्री झाली आहे. देशभरातील साखर कारखान्यांकडून ही आकडेवारी उपलब्ध झाली आहे. या आधीचा हंगाम २०१९-२० च्या तुलनेत साखर कारखान्यांनी आधीच ८.५६ लाख टन साखर जादा विकली आहे. त्यामुळे गेल्या पूर्ण वर्षाच्या तुलनेत साखर विक्री २५३ लाख टनाच्या तुलनेत २६० लाख टनावर पोहोचू शकेल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link