मांजरा परिवाराकडून औसा तालुक्यातील ५ लाख टन उसाचे गाळप

लातूर : यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न डोकेदुखी ठरणार असे चित्र असताना परिसरातील हजारो शेतकऱ्यांच्या मदतीला मांजरा परिवार धावून आला आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मांजरा परिवाराने उत्कृष्ट नियोजन करत औसा परिसरातील किमान पाच लाख मेट्रिक टन ऊसाचे मांजरा परिवाराने गाळप केले आहे. यंदा पावसाअभावी उसाची चांगली वाढ झाली नाही. त्याचा परिणाम साखर उताऱ्यावर दिसून येत आहे.

औसा तालुक्यात लाखो मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होता. सुरुवातीला मारुती महाराज कारखाना व एक खाजगी गुळ उद्योगाकडून गाळप सुरू झाले. मात्र अतिरिक्त ऊस शिल्लक राहिल अशी स्थिती होती. याचवेळी मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी पुढाकार घेतला. तुळजापूर तालुक्यातील कंचेश्वर साखर कारखाना मांजरा परिवारात समाविष्ट करीत या भागातील शेतकऱ्यांना दिलीपराव देशमुख यांनी दिलासा दिला आहे. यावर्षी कारखान्याने तालुक्यातील एक लाख मेट्रिक टन ऊस गाळपास नेला. मारुती महाराज कारखान्याने दोन लाख मेट्रिक टनाचा टप्पा गाठला. शिवाय इतरही कारखाने परिसरात ऊस गाळप करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here