सांगलीमध्ये आगीत ५० एकरातील ऊस खाक, पाऊण कोटींचे नुकसान

सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेएकंदमधील डिग्रज रोडवर बुधवारी लागलेल्या आगीत सुमारे ४० ते ५० एकर ऊस जळाला. या आगीत परिसरातील पाणीपुरवठा संस्थेचे चेंबरही जळून खाक झाले. सर्व शेतकरी, गावकऱ्यांनी आगीच्या दुसऱ्या बाजूस जाऊन ऊस तोडल्यानंतर आग आटोक्यात आली. हाता-तोंडाशी आलेले उसाचे पीक जळून गेल्याने शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. या आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. आगीत सुमारे ७५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कवठेएकंद येथे सुमारे २० ते २५ शेतकऱ्यांच्या शेतातील उसाने पेट घेतला. शेतकऱ्यांनी आग रोखण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. येथील शेतीसाठी रस्ते नसल्यामुळे अग्निशमक दलाची गाडी आल्यानंतरही फारसे प्रयत्न उपयुक्त ठरले नाहीत. लांब अंतरावरून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू राहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here