धाराशिव : नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. रांजणीने सुरू केलेल्या ड्रोनच्या सहाय्याने ऊसावरील औषध फवारणीला कार्यक्षेत्रात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ड्रोनच्या माध्यमातून फवारणीसाठी नॅचरल शुगर ऊस उत्पादकांना ५० टक्के अनुदान देणार आहे, अशी घोषणा नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष कृषीरत्न बी. बी. ठोंबरे यांनी केली. ठोंबरे यांच्या हस्ते कारखान्याच्या प्रांगणात ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. येत्या गाळप हंगामामध्ये ७.०० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यादृष्टीने आत्तापासूनच त्याची सुरुवात सुरू करण्यात येत असल्याचेही ठोंबरे यांनी सांगितले.
अध्यक्ष ठोंबरे यांनी सांगितले की, येत्या ऊस लागवड हंगामामध्ये ऊस रोपांपासून ऊस लागवड मोठया प्रमाणात राबवणार असून त्यासाठी प्रति ऊस रोप ५० पैसे ऊस उत्पादकांना अनुदान देणार आहे. नॅचरल शुगरच्या माध्यमातून मागील २१ वर्षांमध्ये ऊस उत्पादक शेतक- यांसाठी ७००० मे. टन प्रतिदिन गाळप क्षमतेचा साखर कारखाना चालवला जातो. यात बगॅसपासून वीज निर्मिती, वीज निर्मितीवर आधारित फेरो अलॉईज स्टील प्रकल्प, मळीवर आधारीत डिस्टीलरी प्रकल्प, सेंद्रिय खत निर्मिती, इथेनॉल प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प, शैक्षणिक संकुल, समाजातील सामान्यातील सामान्य घटकांचे उत्नतीसाठी डेअरी प्रकल्प, कोल्डस्टोअरेज, ग्रामीण रुग्णालय, सौरउर्जा प्रकल्प, सीएनजीसारख्या जैवइंधनाची निर्मिती व पुरवठा केला जातो. विविध प्रकल्पांची यशस्वीपणे उभारणी करून पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. त्याचे दृश्य परिणाम म्हणजे नॅचरल शुगरची असलेली अत्यंत चांगली आर्थिक परिस्थिती आहे, असे ठोंबरे यांनी सांगितले.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.