नवी दिल्ली : गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स (सीएसटी) काऊन्सीलची ५० वी बैठक सुरू आहे. या बैठकीत ऑनलाइन गेमिंग आणि जीएसटी अपिलिय न्यायाधिकरणसारख्या अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. काऊन्सीलने जीएसटीशी संलग्न प्रमुख मुद्दे जसे करात सवलत, मर्यादा आणि प्रशासकीय प्रक्रियांवर चर्चेत महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, सिनेमागृहांमध्ये विक्री केल्या जाणाऱ्या वस्तू स्वस्त होऊ शकतात. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) ने अशा वस्तूंवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून कपात करून ५ टक्के करावा अशी मागणी केली आहे.
औषधेही स्वस्त होवू शकतात. ज्या औषधांची किमत ३६ लाख रुपये आहे, त्यांना सवलत दिली जावी अशी मागणी आहे. १८ टक्क्यावरून हा जीएसटीसुद्धा ५ टक्क्यावर आणण्याची मागणी करण्यात आली आहे. ऑनलाइन गेमिंग, घोडदौड, कॅसिनोंवरील कर वाढवावा अशी मागणी केली आहे. ई-कॉमर्स बिझनेसवरील टीसीएसबाबतही निर्णय होईल अशी शक्यता आहे.