भारतामध्ये कोरोनावायरस संक्रमितांच्या संख्येत अतिशय वेगाने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या 55,079 नव्या केसेस आढळल्या आहेत. हा दुसरा दिवस आहे, जेव्हा भारतात 50 हजारापेक्षा अधिक संक्रमित मिळाले आहेत. याशिवाय 779 लोकांचा मृत्युही झाला आहे. सध्या भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 16 लाख 38 हजार 871 वर पोचली आहे. आता पर्यंत एकूण 35,747 लोकांचा यामध्ये मृत्यूही झाला आहे. याबरोबरच भारत कोरोनामुळे मृत्यू पावणार्यांच्या बाबतीत जगात दुसर्या स्थानावर पोचला आहे.
देशामध्ये सर्वात जास्त प्रभावित राज्यांबाबत सांगायचे झाल्यास, महाराष्ट्रात परिस्थिती अधिक खराब आहे. इथे आता कोरोनाग्रस्तांची संख्या 4 लाख 11 हजारावर पोचली आहे.तर 24 तासात 266 मृत्यू झाले आहेत. यामुळेच आता एकूण मृतकांची संख्या 14,729 इतकी झाली आहे. देशाच्या एकूण मृत्यूंमध्ये एक तृतीयांश पेक्षा अधिक भाग महाराष्ट्राचाच आहे.
संक्रमित राज्यांमध्ये तामिळनाडूचा दुसरा नंबर आहे. जिथे एक दिवसात सर्वात जास्त 5864 नवे संक्रमित आढळले आहेत. याबरोबरच राज्यामध्ये आता पिडितांचा आकडा 2 लाख 39 हजार 978 झाला आहे. तिसर्या नंबरवर 1 लाख 34 हजार 403 प्रकरणासह दिल्ली आहे. तिसर्या नंबरवर असणार्या दिल्लीमध्ये 3,936 मृत्यूच्या तुलनेत तामिळनाडू मध्येही 3,841 लोकांना जिव गमवावा लागला आहे.
सध्या भारतासाठी एक चांगली गोष्ट म्हणजे, आता पर्यंत एकूण रुग्णापैकी जवळपास 64 टक्के अर्थात 10 लाख 57 हजार पेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 37 हजारपेक्षा अधिक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशामध्ये अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 5 लाख 45 हजार पेक्षा अधिक आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.