56 साखर कारखान्यांनी केले ऊस गाळप बंद
पुणे : महाराष्ट्रामध्ये अनेक साखर कारखान्यांनी ऊस गाळप बंद केले आहे. आता पर्यंत 56 साखर कारखान्यांनी ऊस गाळप बंद केले आहे. ऊसाच्या कमी उपलब्धतेमुळे अनेक साखर कारखान्यांनी या हंगामात भागच घेतला नव्हता. या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना दुष्काळ आणि पूरामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ज्यामुळे अनेक साखर कारखाने संकटात आहेत.
साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार, 15 मार्च 2020 पर्यंत 56 साखर कारखान्यांनी गाळप बंद केले. ज्यामध्ये 17 औरंगाबाद, 9 अहमदनगर, 5 पुणे, 8 कोल्हापूर, 6 नांदेड , 2 अमरावती आणि सोलापूर ९ येथील साखर कारखाने सामिल आहेत. सध्या आतापर्यंत साखर कारखान्यांनी 501.05 लाख टन ऊसाचे गाळप करुन 11.15 टक्के साखर रिकवरी प्रमाणे 558.49 लाख क्विंटल, म्हणजेच जवळपास 55.84 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे.