राज्यात 560 लाख टन ऊस गाळप; कोल्हापूर आघाडीवर

 

 

कोल्हापूर, दि. 24 ; राज्यात आतापर्यंत 560 लाख टन उसाचे गाळप केले असून, 60.80 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

राज्यात  191 साखर कारखान्यांनी प्रतिदिन साडे सहा ते सात लाख टनांची उसाचे गाळप होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी साखर उतारा 0.15 टक्‍क्‍याने वाढलयाचे चित्र आहे. प्रत्येक साखर कारखान्यांचा उतारा  सरासरी 10 ते 13 पर्यंत आहे.

राज्यात गेल्यावर्षी 180 साखर कारखाने सुरू होते.  त्या कारखान्यांनी सरासरी प्रतिदिन सहा ते साडेसहा लाख टन उसाचे गाळप केले होते. आजअखेर मागील वर्षी सुमारे 500 लाख टन उसाचे गाळप झाले होते.  या वेळी साखर उतारा 10.50 टक्के होता. मात्र, या वर्षी थंडीचे वाढलेले प्रमाण व पावसाने दिलेल्या ताणामुळे साखर उताऱ्यात वाढ झाल्याचे सांगतले जात आहे.

राज्यात आजअखेर गाळपात पुणे विभाग अपेक्षेप्रमाणे आघाडीवर आहे. या विभागातील 62 साखर कारखान्यांनी 232 लाख टन उसाचे गाळप केले असून, या कारखान्यांनी 10.42 टक्के साखर उतारा मिळवून 24.46 लाख टन साखर उत्पादित केली आहे. कोल्हापूर विभागाने साखर उताऱ्यातील आपली आघाडी कायम ठेवली आहे. कोल्हापूर विभागात 37 साखर कारखान्यांनी 126 लाख टन उसाचे गाळप करीत 15 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा राज्यात सर्वाधिक 11 ते 12 टक्के साखर उतारा आहे.

डाउनलोड करा चिनीमण्डी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here