माळेगाव कारखान्याचा २०२२-२३ हंगामासाठी ‘एफआरपी’पेक्षा प्रतिटन ५६१ रुपये जादा दर

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने २०२२-२३ या ऊस गळीत हंगामाचा अंतिम वर ३४११ रुपये प्रतिटन इतका जाहीर केला. त्यामुळे ऊस उत्पादक सभासदांना ‘एफआरपी’पेक्षा ५६१ रुपये अधिक मिळणार आहेत, तर गेटकेनधारक शेतकऱ्यांना ३१०१ रुपयांप्रमाणे अंतिम ऊस बिल आदा होणार आहे. सध्याला ‘एफआरपी’पेक्षा जादा रक्कम देण्यात ‘माळेगाव’ राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे व उपाध्यक्ष सागर जाधव यांनी दिली.

माळेगाव कारखान्याने गतवर्षीच्या हंगामात १२ लाख ५० हजार ४६५ टन उसाचे गाळप केले आहे. त्यामध्ये सभासदांचा ७ लाख २६ हजार, तर गेटकेनधारकांचा ५ लाख ३३ हजार टन उसाचे गाळप केले होते. ११.८१ टक्के उताऱ्यानुसार १३ लाख २८ हजार ९०० क्विंटल साखर निर्मिती केली होती. सहविजनिर्मितीतून ५ कोटी ४९ लाखा ७० हजार युनिटची वीज विक्री केली. डिस्टलरीतून २ कोटी १७ लाख ८० हजार लिटर अल्कोहोल व १ कोटी ८३ लाख ४२ हजार लिटर इथेनॉल निर्मिती केली होती.

माळेगाव कारखान्याची एफआरपी २८५१ प्रतिटन इतकी असून, आतापर्यंत सभासदांना एफआरपी व १०० रुपये कांडेपमेंटसह २९५१ रुपये दिले आहेत. आता उर्वरित प्रतिटन ४६० रुपये इतकी रक्कम आगामी काळात सभासदांना मिळणार आहे. तर गेटकेनधारकांना याअगोदर दिलेली २८५१ रुपये वगळता उर्वरित २४९ रुपये मिळणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here