इंदौर /भोपाळ : मध्य प्रदेशात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मृत झालेल्यांचा आकडा 58 वर पोचला आहे. तर तीन महिला पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत.
शैलजा पारखी (इंदौर) आणि नीता शेळके (उज्जैन) या दोघी सोमालिया रोडवर कारसह वाहून गेल्या. या दोघीही शिक्षिका असून बारखेडा बुजुर्ग खेड्यातील शाळेतील एक कार्यक्रम संपवून घरी परत येत होत्या.
मी माझ्या मुलासह पूल ओलांडत होते, तेव्हाच या पूलावर पाणी आले होते. त्यापूर्वी शैलजा अणि निता वाहून गेल्या असाव्यात, असे त्यांची सहकारी प्रियांजली तोमर हिने सांगितले. त्यांचे मोबाईलदेेखील नॉट रिचेबल आहेत आणि त्या दोघींना वाहून जाताना कोणीच पाहिले नसल्याचे सबडिव्हिजनल ऑफिसर संध्या राय यांनी सांगितले.
एक महिला आणि मुलगी पूल कोसळल्यामुळे बुडून गेल्या असल्याचेही समोर आले. हा पाअस इतका मोठा होता की, मंडासूर यथील प्रसिद्ध पशुपती नाथाच्या मंदिरात पूराच पाणी घुसल होतं. बुधवारी रात्री भोपाळच्या जबलपूर, गुना, पंचमढी या भागात 67 मिलीमीटर पाउस पडला.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्य प्रदेश आणि दक्षिणेकडील मध्यवर्ती भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हा पाउस झाला. भोपाळमध्ये 74 टक्के तर मध्य प्रदेशात 18 टक्के पाउस गतवर्षीच्या तुलनेत अधिक झाला.
भोपाल महानगरपालिकेने गुरुवारी रात्री वरच्या तलावाचे चार स्लूस गेट उघडले. गेल्या दोन वर्षात हा लाव पूर्ण पातळीपेक्षा खूपच कमी होता. यावर्षी चार वेळा गेट उघडले गेले, असे महापालिकेचे शहर अभियंता ए.के. पवार यांनी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.