लवकरच होणार ५जी मोबाइल सेवेचे लाँचिंग, कॅबिनेटकडून ५ जी स्पेक्ट्रमच्या लिलावास मंजुरी

नवी दिल्ली : देशात लवकरात लवकर ५ जी मोबाईल सेवा सुरू होणार आहे. ५ जी स्पेक्ट्रम लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत पुढील २० वर्षांसाठी ५ जी स्पेक्ट्रम लिलावास मंजुरी देण्यात आली आहे. जुलैच्या अखेरीस स्पेक्ट्रमचा लिलाव होईल. सरकारने सांगितले की, ७२
गीगीहर्ड्स स्पेक्ट्रमचा लिलाव (६०० मेगाहर्ट्ज, ७०० मेगाहर्ट्ज, ८०० मेगाहर्ट्ज, ९०० मेगाहर्ट्ज, १८०० मेगाहर्ट्ज, २१०० मेगाहर्ट्ज, २३०० मेगाहर्ट्ज), मिड (३३०० मेगाहर्ट्ज) आणि उच्च (२६ गीगाहर्ट्ज) फ्रिक्वेंसी बँडमध्ये करण्यात येणार आहे.

याबाबत एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ५ जी दूरसंचार सेवा लवकरात लवकर सुरू होण्याची अपेक्षा आहे. ४ जी मोबाईल सेवेच्या तुलनेत ५ जी मोबाईल सेवेची स्पीड आणि क्षमता दहा पटींनी अदिक असेल. स्पेक्ट्रमसाठी समान २० वार्षिक हप्त्यांमध्ये पैसे दिले जाऊ शकतात. यासाठी प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला अॅडव्हानमध्ये पैसे द्यावे लागतील. यातून रोखतेचा प्रवाह गरजेपेक्षा कमी येणे आणि या क्षेत्रातील व्यवसायात गुंतवणूक कमी भासेल अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here