देशातील 6 करोड शेतकरी ‘प्रधानमंत्री शेतकरी योजनेच्या’ लाभापासून वंचित; हे आहेत उपाय

नवी दिल्ली: आवेदन आणि आधार कार्ड मध्ये असणार्‍या चुकांमुळे देशातील 6 करोड शेतकरी ‘प्रधानमंत्री शेतकरी योजनेच्या’ लाभापासून वंचित आहेत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या पीएम शेतकरी टीमचा गोरखपूर येथील एका शेतकर्‍याच्या मोबाईलवर संदेश मिळाला. या संदेशातून स्पष्ट झाले की, कागदपत्रांच्या गडबडीमुळे प्रधानमंत्री शेतकरी सम्मान निधी योंजनेतील तिसरा हप्ता बँकेच्या खात्यात पोचलेला नाही. असे तब्बल पावणे सहा करोड शेतकरी आहेत, ज्यांना आधार व्हेरीफिकेशन मुळे अंतिम हप्ता मिळालेला नाही.

व्हेरीफिकेेशच्या अभावामुळे देशातील 9 राज्यात शेतकर्‍यांना शेवटचा हप्ता मिळालेला नाही. देशात यावेळी 7.5 करोड शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. यामधील पावणे दोन करोड शेतकर्‍यांनां शेवटचा हप्ता मिळालेला आहे. या योजनेचे दोन हप्ते लोकसभा निवडणूकी पूर्वी कोणत्याही ओळखपत्राशिवाय देण्यात आले होते. पण तेंव्हाच शेवटच्या हप्त्यासाठी आधार कार्डची अट ठेवण्यात आली होती.  बायोमेट्रीक व्हेरिफिकेशन वरुन अशा लोकांचीही ओळख पटू लागली आहे की, ज्यांनी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि त्या लोकांच्या कागदपत्रांचीही दुरुस्ती केली जात आहे, ज्यांच्या आवेदन आणि आधार कार्डवर नाव किंवा स्पेलिंग मध्ये अंतर आहे.

योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकर्‍याला तीन वेळा 2-2 हजार रुपये शेतीसाठी देण्यात येतील. ज्यांची आधार कार्ड अपूर्ण आहेत, त्यांनी ती अपडेट करुन घ्यावीत, असे कृषी मंत्रालयाच्या अधिकार्‍याने सांगितले. तसेच जे शेतकरी या योजनेचा गैरफायदा घेत आहेत त्यांची माहिती या आधार व्हेरिफिकेशनमुळे समोर येईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here