मुंबई : हवामान विभागाने उद्या, शुक्रवारसाठी राज्यातील ६ जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला. सिंधुदूर्ग, सातारा, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला. तर कोकणातील सिंधुदूर्ग, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई तसेच पुणे, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. विदर्भातील उरलेले चार जिल्हे मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली तसेच नगर आणि कोल्हापूर जिल्हाला काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींचा अंदाज आहे.
शनिवारी विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. बुलडाणा, अकोला आणि वाशीम जिल्ह्याला येलो अलर्ट तर उरलेल्या ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तसेच कोकणात सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर उरलेल्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला.कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड तसेच जळगाव जिल्ह्यालाही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. रविवारी आणि सोमवारीही कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील काही ठिकाणी जोरदार तर अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.