‘ओलम’कडून ६ लाख ४१ हजार टन ऊस गाळप : भरत कुंडल

कोल्हापूर : राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम (हेमरस) साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात ६ लाख ४१ हजार १११ मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, कामगार, अधिकारी आणि ओलमच्या हितचिंतकांमुळे हा टप्पा गाठणे शक्य झाले, असे प्रतिपादन कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी केले. कारखान्याच्या १४ व्या गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते.

गळीत हंगाम सांगता प्रसंगी एचआर नीता लिंबोर यांनी मनोगत व्यक्त केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शेती अधिकारी दत्तराज गरड, ऊसपुरवठा विभागाचे सहायक व्यवस्थापक अनिल पाटील, पाटणे झोनचे सहायक व्यवस्थापक नामदेव पाटील, कोवाड झोनचे सहायक व्यवस्थापक भागोजी लांडे, केनयार्ड सुपरवायझर दीपक वांद्रे, जयदीप जैन, शशांक शेखर आदी उपस्थित होते. सतीश कागणकर यांनी सूत्रसंचालन केले. अनिल पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here