सांगली : गळीत हंगामात ऊस तोडणी मजूर पुरविण्याच्या आमिषाने वाहतूकदार वसंत आण्णा हौजे (रा. मौजे डिग्रज) यांची सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित बळीराम यशवंत हाके (रा. जुनोनी, ता. सांगोला) व सहकारी चंद्रकांत तातोबा आवळे (रा. करंजे, ता. खानापूर) या दोघांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसंत हौजे यांच्याकडून संशयित संशयित बळीराम हाके आणि चंद्रकांत आवळे या दोघांनी वसंत हौजे यांनी ऊस तोडणी मजूर पुरवतो असे सांगून सहा लाख रुपये उकळले. १२ सप्टेंबर २०१९ व दि. ३० ऑक्टोबर २०१९ रोजी हा प्रकार घडला. मात्र, संशयितांनी कारखान्याच्या गळीत हंगामात ऊसतोड मजूर पुरवले नाहीत. हौजे यांनी पैशाची विचारणा केल्यानंतर संशयित गेले तीन ते चार वर्षे टोलवाटोलवी करीत आहेत. त्यामुळे हौजे यांनी संशयितांविरोधात सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.