निरा भिमा कारखान्याचे 6 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

पुणे : निरा भिमा कारखान्याकडून आगामी गळीत हंगामामध्ये 6 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, त्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या 2023-24 च्या 23 व्या ऊस गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाला.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, निरा भिमा कारखान्याने गेली 23 वर्षे शेतकऱ्यांच्या विकासामध्ये मोठे योगदान देत आहे. गत हंगामासाठी कारखान्याने शेतकऱ्यांना प्रति टन 2500 रुपये प्रमाणे ऊस बिलाची सर्व रक्कम अदा केली आहे. कारखान्याच्या देव, एफ.आर.पी. पेक्षा सदरची रक्कम 213 रुपये एवढी जास्त आहे. आगामी गळीत हंगामात साखर उतारा वाढीसाठी शेती विभागाने ऊस तोडणीचे योग्य नियोजन करावे. आगामी गळीत हंगामासाठी काटा पेमेंट करण्याचे नियोजन आहे. कर्मचाऱ्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला नियमित होत असून, दिवाळीसाठी एक पगार बोनस दिला जाईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

स्वागत कार्यकारी संचालक हेमंत माने यांनी केले. प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी केली. याप्रसंगी सत्यनारायणाची महापूजा संचालक हरिदास घोगरे वृंदावना घोगरे या उभयतांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी विलासराव वाघमोडे उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील कृष्णा यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, दादानी घोगरे, संजय घोडके, प्रकाश मोहिते, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, देवराज जाधव, सुरेश मेहेर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष घोगरे यांनी केले. आभार कांतीलाल झगडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here