ढाका: बांग्लादेश सरकारने नुकसानीमध्ये सुरु असलेले 6 साखर कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर या कारखान्यांमध्ये काम करत असलेले श्रमिक आणि अधिकार्यांना मोठा धक्का बसला. पण साखर आणि खाद्य उद्योग निगम ने सांगितले की, ते श्रमिक आणि अधिकार्यांचा पगार कायम देतील. या महिन्याच्या सुरुवातीमध्ये सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला होता. गुरुवारी या निर्णयाचे पत्र संबंधीत कारखान्यांच्या व्यवस्थापन निदेशकांकडे पाठवण्यात आले आहे.
बीएएफआईसी चे चेअरमन सनत कुमार साहा यांनी सांगितले की, पबना साखर कारखान,, श्यामपुर साखर कारखाना, पंचगढ कारखाना, सेतगंज कारखाना, रंगपुर साखर कारखाना आणि कुश्तिया कारखाना पुढची सूचना मिळेपर्यंत बंद राहतील. त्यांनी सांगितले की, सागर कारखान्याच्या उत्पादन क्षेमतेसह अनेक कारणांपासून कारखाने मोठ्या काळापासून नुकसानीत होते. सुधारणा आणि आधुनिकीकरण करण्यासाठी कारखाने आता बंद केंले जात आहेत.
सरकारच्या 15 साखर कारखान्यांना अनेक कारणांमुळे प्रत्येक वर्षी जवळपास 10 बिलियन टीके चे नुकसान होत आहे, ज्यामध्ये अतिरिक्त श्रमशक्ती, बिघडलेली मशिनरी, कच्च्या मालाची कमी, दिर्घकालिन बॅ्रंक कर्जावर वाढते व्याज सामिल आहे. खाजगी रिफाइनरीमध्ये उत्पादित पांढरी साखर बाजारात 60 ते 80 टीके प्रति किलो वर उपलब्ध आहे, तर सरकारी कारखान्यांमध्ये उत्पादित साखरेची किमत यापेक्षा खूप जास्त आहे. कर्जात बुडालेल्या कारखान्यालाही वेळेवर उस शेतकर्यांना पैसे देण्यात अडचण येत आहे. बीएसएफआईसी नुसार, आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये साखर कारखान्यांनी टीके 9.7 बिलियन चे नुकसान सोसले आहे. गेल्या पाच वर्षांपासून संचित नुकसान टीके 39.76 बिलियन इतके राहिले.