बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच
मॉस्को (रशिया) : चीनी मंडी
रशियामध्ये यंदा २०१९च्या हंगामात बीट उत्पादन ४१० लाख टनपर्यंत होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन ६० लाख टनाच्या आसपास होईल, अशी माहिती रशियाच्या कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
साखरेची आयात कमी करण्यासाठी गेल्या दहा वर्षांत रशियाने साखरेचे उत्पादन प्रयत्नपूर्वक वाढवले आहे. त्यामुळे आता साखरेची निर्यातही रशियाला शक्य झाली आहे. यंदाचे साख उत्पादन देशांतर्गत बाजारपेठेची गरज भागवण्यासाठी पुरेसे असून, निर्यात करणेही शक्य होणार आहे. १ जानेवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार रशियाकडे सध्या ५१ लाख टन साखरेचा साठा आहे.
तरी देखील रशिया बेलारूसकडून साखरेची आयात काही प्रमाणात सुरूच ठेवणार आहे. त्यामुळे त्यांची देशांतर्गत साखरेची गरज सुरक्षित राहील आणि त्यांना साखरेची निर्यात करणे शक्य होईल, असे मत साखर उत्पादक संघटनेचे आंद्रे बोदिन यांन व्यक्त केले आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp