कोल्हापूर, ता. 21: महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 600 कोटी रु निधीला केंद्राकडून मंजुरी मिळाल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत दिली.
खासदार संजय मंडालिक यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि मुंबईसह महाराष्ट्रातील 29 जिल्हे महापुराच्या आणि अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडले होते. या काळातील शेती आणि शेतातील उभ्या पिकाच्या नुकसानीबाबत केंद्र सरकारकडे काय माहिती आहे? नुकसानग्रत्सांना किती व कोणती मदत देणार आहात? असा अतारांकित प्रश्न खासदार मंडलिक लोकसभेमध्ये केला होता. मंडलिक यांच्यासमवेत सुधीर गुप्ता, धैर्यशील माने, गजानन कीर्तिकर यांनीही सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला होता.
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार उचलत असलेल्या जबाबदारीला केंद्र सरकार सर्व प्रकारची मदत करण्यासाठी तयार असल्याचे सांगून गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी उत्तर देताना म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमध्ये राज्य सरकार एसडीआरएफ कडून आर्थिक मदत देऊ शकते. केंद्राकडून यापूर्वीच आयएमसिटी हे केंद्रीय दल या पूरग्रस्त व नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी गठीत केले आहे. महाराष्ट्रामध्ये 29 ऑगस्ट ते 1सप्टेंबर या काळात या केंद्रीय दलाने पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. महाराष्ट्र सरकारकडून 2110.62 कोटी रू.नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. यापैकी महाराष्ट्रा करीता 600 करोड रुपयांचा निधी देण्यासाठी केंद्राने मंजुरी दिली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.