नानजिंग, चीन : पूर्व चीनमधल्या जिआंग्सु प्रांतातील,नानटोंग शहरात सीमा शुल्क अधिक़ार्यांनी साखर तस्करी प्रकरणात पाच लोकांना ताब्यात घेतले आहे.
स्थानिक अधिक़ार्यांनी सांगितले की, 11 डिसेंबर ला सीमा शुल्क अधिकार्यांनी नानटोंग परिसरात यांग्त्जी नदीतुन जवळपास 600 टन साखर घेवून जाणार्या जहाजाला जप्त केले आहे. प्राथमिक तपासणीत समजले की, या साखरेची तस्करी करण्यात आली आहे आणि यासाठी कोणतेही आयात प्रमाणपत्र नाही. याबाबत अधिक तपास सुरु आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.