नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीच्या रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. शनिवारी दिवसभरात ६२ हजार २५८ नवे रुग्ण आढळले. या वर्षातील ही सर्वाधिक संख्या आहे. गेल्या पाच महिन्यांत पहिल्यांदाच एकाच दिवशी कोरोनाचे इतके रुग्ण आढळले आहेत. याशिवाय देशात कोरोना रुग्णांची सक्रिय संख्या साडेचार लाखांवर गेली आहे. तर गेल्या २४ तासांत २९१ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला.
शनिवारी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण १ कोटी १९ लाख ८ हजार ९१० एकूण रुग्ण संक्रमित झाले आहेत. त्यापैकी १ कोटी १२ लाख ९ हजार २३ जण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत ३०,३८६ जण कोरोनातून पूर्ण बरे झाले. तर अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत ३१ हजार ५८१ जणांची भर पडली. देशात कोरोना रिकव्हरीचा दर ९४.८५ टक्के आहे.
आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, भारतात काल अखेरपर्यंत कोरोनाचे २३ कोटी ९७ लाख ६९ हजार ९१५ चाचण्या घेण्यात आल्या. त्यात ११ लाख ६४ हजार ५५३ चाचण्या काल घेण्यात आल्या. आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ६२ हजार २४० जणांना जीव गमवावा लागला आहे. सध्या देशात ४ लाख ५२ हजार ६४८ रुग्ण असून ५,८१,०९,७७३ जणांना लस देण्यात आली आहे.