मुंबई: भारतीय हवामान विभागानुसार, या वर्षी मुंबईमध्ये सरासरी हंगाम वर्षाच्या तुलनेत 67 टक्के अधिक पाऊस झाला. हवामान विभागानुसार, राज्यामध्ये हंगामी पाऊस सामान्य राहीला. संपूर्ण हंगामात मराठवाड्यात अतिरिक्त पाऊस पडल्यामुळे यावर्षी महाराष्ट्रात 16 टक्क्यांनी अधिक पावसाची नोंद झाली. मराठवाड्यामध्ये 30 टक्के अधिक पाऊस झाला. विदर्भातील अमरावती (-20), अकोला (-27) आणि यवतमाळ (-24) मध्ये कमी पाऊस झाला.
मुंबईमध्ये 1 जूनपासून 30 सप्टेंबर पर्यंत 3,686.8 मिमी पाऊस झाला, तर हंगामाची सरासरी 2,205.8 मिमी होती. हवामान विभागाकडून जाहिर करण्यात आलेल्या नव्या विस्तारीत भविष्यानुसार, राज्यामध्ये 15 ऑक्टोबरच्या आसपास दक्षिण पश्चिम मान्सून परतण्याची शक्यता आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.