हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
रायपूर (छत्तीसगड) : चीनी मंडी
छत्तीसगडमधील साखर कारखान्यांना ६८ टन साखर विक्रीचा कोटा जाहीर करण्यात आला आहे. आता राज्यातील कारखाने साखरेची विक्री करू शकणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे कॅश फ्ले वाढण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्याकडील साठाही कमी होणार आहे. साहजिकच त्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी भागवता येणार आहेत.
सरकारकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात २०० कोटी रुपयांचा साखर साठा शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची जवळपास १०० कोटी रुपयांची देणी भागवणे अशक्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर छत्तीसगडचे साखर आयुक्त भीम सिंह यांनी केंद्रात अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यात त्यांनी कारखान्यांकडे उपलब्ध साठा आणि शेतकऱ्यांच्या थकीत देणी याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडून राज्यातील चार साखर कारखान्यांसाठी साखर विक्री कोटा जाहीर करण्यात आला. आता चारही साखर कारखान्यांची मिळून ६८ हजार किलो साखर बाजारपेठेत विक्री होणार आहे. आता साखरेचा साठा कोठे करायचा, तसेच शेतकऱ्यांची देणी कशी भागवायची याची कारखान्यांची चिंता दूर होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, साखर आयुक्त भीम सिंह यांनी मुख्य सचिवांना याबाबत पत्र लिहिले आहे. यात साखर कारखान्यांना कर्ज उपलब्ध करून देण्या संदर्भात विनंती करण्यात आली आहे. मुख्य सचिवांनी राज्याच्या शिखर बँकेला या संदर्भात हमी देण्याची सूचना द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. यामुळे कारखान्यांना कर्ज उपलब्ध होईल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सर्व देणी भागवता येतील, अशी भूमिका साखर आयुक्तांनी मांडली आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp