महराजगंज : इंडियन पोटॅश लिमिटेड साखर कारखान्याने आपल्या ६८० ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होळीच्या पूर्वसंध्येला थकीत बिले अदा करून सणाची भेट दिली आहे. कारखान्याने या हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या ६८० कारखान्यांना १.९८ कोटी रुपयांची ऊस बिले दिली आहेत.
दरम्यान, अद्याप ३१.९५ कोटी रुपये कारखान्याकडे थकीत आहेत. जिल्हा ऊस अधिकारी जगदीशचंद्र यादव यांनी सांगितलेकी, आयपीएल साखर कारखान्याकडे चालू गळीत हंगामात सुमारे ३३ कोटी ९३ लाख २९ हजार रुपयांची थकबाकी आहे. यापैकी कारखाना प्रशासनाने ६८० शेतकऱ्यांना सुमारे १ कोटी ९८ लाख १४ हजार रुपये दिले आहेत. अद्याप कारखान्याकडे ३१ कोटी ९५ लाख १५ हजार रुपये थकीत आहेत. कारखान्याच्या व्यवस्थापकांना पैसे देण्याची गती वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
इतर कारखान्यांशी पत्रव्यवहार
सिसवा कारखान्यासोबत जेएचव्ही साखर कारखाना गडौरा, कप्तानगंज साखर कारखाना, पिपराइच साखर कारखाना, रुधौली साखर कारखान्यांना जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी पत्र पाठवून शेतकऱ्यांना पैसे देण्याची प्रक्रिया गतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.