पुणे : दी डेक्कन शुगर टेक्नॉजिस्टम् असोसिएशन (डीएसटीए) च्या वतीने येत्या 24 आणि 25 सप्टेंबर रोजी 68 वे वार्षिक अधिवेशन आणि शुगर एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन आणि शुगर एक्स्पो जे. डब्ल्यू, मॅटिऑट हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आले आहे. शुगर एक्स्पोमध्ये देशातील नामवंत कंपन्या सहभागी होणार आहेत.
या अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता होईल. अधिवेशनाला देशभरातील साखर उद्योग क्षेत्रातील साखर कारखानदार, संशोधक, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या अधिवेशनात संशोधकांकडून शोध निबंध सादर केले जातात. त्याचा उपयोग साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी केला जातो. यंदा 45 शोध निबंध सादर केले जाणार आहेत. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह विविध तांत्रिक विषयावर नामवंत मार्गदर्शन करणार असल्याची माहिती ‘डीएसटीए’ने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. शुगर एक्स्पोला भेट देण्याचे आवाहन ‘डीएसटीए’चे अध्यक्ष एस.बी. भड, अधिवेशनाचे अध्यक्ष एस. एस. शिरगावकर, उपाध्यक्ष एम. के. पटेल, एस. डी. बोखारे आणि कार्यकारी सचिव गौरी पवार यांनी केले आहे.