कोल्हापूर जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांना राज्य सरकारकडून ६९२ कोटी रुपयांची ‘हमी’

कोल्हापूर : राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात साखर ‘पेरणी’ सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी सत्ताधाऱ्यानी आपल्या समर्थक नेत्यांच्या साखर कारखान्यांना आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न चालवला आहे. राज्य सरकार ने राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून कर्ज मिळवून देण्यासाठी आणखी चार साखर कारखान्यांना ६९२ कोटी रुपयांची हमी दिली आहे. कुंभी कासारी, सदाशिवराव मंडलीक, शरद व राजाराम या साखर कारखान्यांना हे पैसे मिळणार आहेत. यापूर्वी राज्य सरकारने ११ कारखान्यांना १८०० कोटी रुपयांची हमी दिली आहे.

यामध्ये माजी खासदार संजय मंडलिक यांच्या सदाशिवराव मंडलीक कारखान्यास १५० कोटी, माजी मंत्री आणि आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर यांच्या शरद साखर कारखान्यास २०२ कोटी, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या कुंभी कासारी कारखान्यास १६४ कोटी आणि भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या छत्रपती राजाराम कारखान्यास १७६ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. राज्यातील ११ कारखान्यांना काही दिवसापूर्वी १८०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले होते. आता शिवसेना व भाजपशी संलग्न असलेल्या चार कारखान्यांना अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे. साखर कारखानदारीच्या माध्यमातून विधानसभेची मोट बांधण्याचे काम सुरु झाले आहे.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here