संत एकनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ७५ उमेदवार रिंगणात

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत २१ जागांसाठी ७५ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. छाननी प्रक्रियेदरम्यान माजी आमदार संजय वाघचौरे यांच्यासह आठ जणांचे उमेदवारी अर्ज रद्द ठरविण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाचे विष्णू रोडगे, जाधव हे निवडणूक प्रक्रिया सांभाळत आहेत. अर्ज माघारीसाठी २९ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत असून ३० रोजी उमेदवारांना चिन्हे वाटप होईल. कारखान्यासाठी ११ फेब्रुवारी रोजी मतदान व मतमोजणी होईल.

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ५ ते ११ जानेवारी यांदरम्यान ८८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. छाननीत कारखान्याला ऊस न दिल्याच्या कारणाने हरकत दाखल झाल्याने माजी आमदार संजय वाघचौरे, शहादेव नरवडे, जनार्दन कागदे, धनराज भुमरे, पटेल एजाज, जनार्दन निवारे, संतोष खराद, राजेंद्र गाभूड यांचा उमेदवारी अर्ज रद्द ठरविण्यात आला. दरम्यान, जास्तीत जास्त उमेदवार बिनविरोध निवडून यावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सचिन घायाळ गटाचे ६ उमेदवार बिनविरोध होणार, असा दावा घायाळ समर्थकांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here