नवी दिल्ली: भारतामध्ये शनिवारी कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या एक लाखावर गेली आणि कोरोनाग्रस्तांचा आकडा 64 लाखावर पोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याची माहिती देण्यात आली. कोरोनाच्या दैनिक केसमध्ये आज काही घट दिसून आली.
मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, गेल्या 24 तासात कोरोनाचे 79,476 नवे रुग्ण आढळले. तर कोरोनामुळे मृत्यु पावलेल्यांची संख्या 1,069 इतकी राहिली. आतापर्यंत देशामध्ये या वायरसमुळे 64,73,545 लोक संक्रमित झाले आहेत. देशामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 9,44,996 इतकी आहे.
तर 54,27,707 रुग्ण बरे झाले आहेत. आणि उपचारानंतर घरी आले आहेत. दुसरीकडे, कोरोनामुळे देशामध्ये जिव गमावणार्यांची संख्या 1,00,842 झाली आहे. मृतांची संख्या 1 लाखावर गेली आहे. आणि आता भारत तिसर्या क्रमांकाचा देश बनला आहे. भारताच्या पुढे अमेरिका (2,12,000 मृत्यु) आणि ब्राझील (1,44,000 मृत्यु) आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.