सातारा : यंदा आव्हानात्मक हंगामामध्ये उसाची टंचाई असूनसुद्धा श्रीदत्त इंडिया कारखान्याने कारखान्याच्या इतिहासात प्रथमच उच्चांकी गाळप केले आहे. कारखान्याने ८ लाख ६२ हजार ९५२ मॅट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला आहे, असे प्रतिपादन मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी केले. कारखान्याच्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्री दत्त इंडियाचे संचालक चेतन धारू, महंत शामसुंदर विधवांस महाराज, व्हाईस प्रेसिडेंट मृत्युंजय शिंदे प्रमुख उपस्थित होते.
अजितराव जगताप म्हणाले की, गेल्यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे उसाची कमतरता प्रकर्षाने जाणवणार हे निश्चित होते. मात्र कंपनीचे कार्यकारी संचालिका प्रीती रूपरेल व संचालक जितेंद्र धारू यांनी तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांना मागील चार वर्षे वेळेवर दिलेली ऊस बिले व अचूक वजन काटा यामुळे तालुक्याबाहेरील शेतकऱ्यांनीही कारखान्यावर विश्वास दाखवला आहे. यावेळी केन मॅनेजर सदानंद पाटील, शेतकी अधिकारी रमेश बागनवर, प्रोडक्शन मॅनेजर भारत तावरे, दिगंबर माने, चीफ केमिस्ट नितीन नाईकनवरे, चीफ इंजिनिअर अजित कदम, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे सेक्रेटरी राजेंद्र भोसले, पोपटराव भोसले, खजिनदार गोरख भोसले, एचआर विराज जोशी, ऋतुराज पाटील, मच्छिंद्र भोसले, पै संतोष भोसले, एस. के. भोसले, नितीन भोसले, अजय कदम उपस्थित होते.