मुंबई : महाराष्ट्रात आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार, कोरोनाचे नवे ८१० नवे रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. यासोबतच गेल्या २४ तासात मुंबईतील तिघांसह पाच जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांची संख्या वाढून ८०,९७,२९४ झाली आहे. तर १,४८,२३४ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे कालच्या एका दिवसात कोरोनाचे नवे १६३९ रुग्ण आढळले होते. तर पाच जणांचा मृत्यू झाला होता.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत कोविड १९ चे नवे ३५१ रुग्ण आढळले आहेत. विभागातील माहितीनुसार, राज्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यातील तिघे मुंबईतील आहेत. तर एक रुग्ण नागपूर आणि आणखी एकजण गोंदियातील आहे. महाराष्ट्राचा कोविड मृत्यू दर १.७३ टक्के आहे. आरोग्य विभागाच्या बुलेटिननुसार गेल्या २४ तासात संक्रमणमुक्त झाल्यानंतर एकूण १०१२ जणांना घरी पाठवण्यात आले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ७९,३७,५८८ जण कोरोनातून बरे झाले आहेत.