मेरठ : मेरठ जिल्हा ऊस विभागाने साखर कारखान्यांच्या सध्याच्या २०२०-२१ या हंगामाची समाप्ती केली आहे. मेरठ जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांनी या सत्रात ४,८८,००० टीडीसी क्षमतेसह उसाचे गाळप केले. यामध्ये ८१७.६५ लाख क्विंटल ऊसाचे गाळप करण्यात आले. त्यापासून ८७.४५ लाख क्विंटल उसाचे उत्पादन झाले आहे. साखरेचा सरासरी उतारा १०.८८ टक्के राहिला.
ऊस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या सत्रामध्ये उसाचे गाळप, साखर उत्पादकता आणि साखर उतारा हा गेल्या हंगामाच्या तुलनेत कमी आहे. गेल्या सत्राच्या तुलनेत सध्याच्या हंगामात ५.८० लाख क्विंटल गाळप कमी झाले आहे. यासोबतच साखर उत्पादन ६.३५ लाख क्विंटलने घटले आहे. जिल्हा ऊस अधिकारी डॉ. दुष्यंत कुमार यांनी सांगितले की, शेतकऱअयांनी सातत्याने इतर उत्पादनासाठी जागरुक केले जातआहे. उसासोबतच शेतकरी टोमॅटो, स्वीट कॉर्न, टरबूज याशिवाय भाजीपाला आणि फळांचे उत्पादन घेत आहेत.
चालू हंगामात मवाना कारखान्याने २०१.७५ लाख क्विंटल उसाचे गाळप करून २०.५३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. दौराला कारखान्याने २२८.०४ लाख क्विंटलचे गाळप करून २३.३९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. सकौती कारखान्याने ३१.८४ लाख क्विंटलचे गाळप करून ३.६४ लाख क्विंटलचे उत्पादन घेतले. किनौनी कारखान्याने १८५.०१ लाख क्विंटल उसाचे गाळप करून २१.८२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. मोहिउद्दीनपूर कारखान्याने ६६.२३ लाख क्विंटलचे गाळप करून ६.८१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. नंगलामल कारखान्याने १०४.७८ लाख क्विंटल उसाचे गाळप करून ११.२६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.