हुतात्मा कारखान्यासाठी ८२ टक्के मतदान, आज मतमोजणी

सांगली : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी रविवारी मोठ्या चुरशीने ८२ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ६७२६ मतदारांपैकी ५५४४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, आज, इस्लामपुरात सकाळी मतमोजणी होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष म्हणून वैभव नायकवडी १० वर्षे कार्यरत आहेत. हुतात्मा पॅनेलमध्ये नागनाथअण्णा यांच्या कन्या निवृत्त मुख्याध्यापिका विशाखा कदम, अण्णांचे नातू हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी हे या संचालक मंडळात प्रथमच सहभागी होत आहेत. रविवारी मतदानावेळी हुतात्मा पॅनेलचे नेते वैभव नायकवडी, गौरव नायकवडी, जय हनुमान पॅनेलचे नेते चंद्रशेखर शेळके यांनी शाळा क्रमांक १ मध्ये मतदान केले. तर हुतात्मा साखर कारखान्याच्या निवडणुकीवेळी विरोधी पॅनेलला बऱ्याच गटात सक्षम उमेदवार मिळाले नाहीत. उमेदवारांचे अर्ज छाननीत अवैध ठरले. पॅनेलच्या ९ जागा बिनविरोध झाल्या. ११ जागांसाठी ही निवडणूक लागली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here