उत्तर प्रदेशातील १२१ साखर कारखान्यांकडून ८३ टक्के ऊस बिले अदा

लखनौ : उत्तर प्रदेशात चालू गळीत हंगामात, राज्यातील १२१ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २९,०५३ कोटी रुपयांची ऊस बिले दिली आहेत. चालू हंगामातील एकूण ऊस बिलांच्या तुलनेत याची टक्केवारी ८३ इतकी आहे. राज्याच्या ऊस आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी या १२१ कारखान्यांनी आतापर्यंत ९७५.७३ लाख टन उसाचे गाळप करून १०३.२८ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांमध्ये गाळप पूर्ण झाले आहे.

राज्यात २०२२-२३ च्या गळीत हंगामात सहभागी ११८ साखर कारखान्यांपैकी एक वगळता सर्व साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना ऊस बिले दिली आहेत. या एका खासगी कारखान्यावर २१३ कोटी रुपयांचा उसाची थकबाकी होती. गेल्यावर्षी या कारखान्यांनी १०९८.८२ लाख टन उसाचे गाळप करून १०४.८२ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले होते. २०१७ पासून आतापर्यंत राज्यात तीन नवीन साखर कारखाने सुरू करण्यात आले असून सहा जुने बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यात २८५ नवीन खांडसरी युनिट उघडण्यात आले, ज्यामुळे सुमारे ४२,००० लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. या नवीन खांडसरी युनिट्सने दररोज १,८४,३०० टन उसाचे गाळप केले. ३१ मार्चअखेर राज्यात १७५.११ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here