पुणे : राज्यात १०३ सहकारी व १०४ खासगी अशा एकूण २०७ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात २३ फेब्रुवारीपर्यंत ८ कोटी ५७ लाख ६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून ८५ लाख २८ हजार मेट्रिक टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.९५ टक्के आहे. राज्यातील अनेक साखर कारखान्यांना यंदा उसाचा तुटवडा जाणवत आहे. तोडणी कामगांराची कमतरता असल्याने अनेक शेतकऱ्यांना शेतातच ऊस वाळतोय की काय, अशी भीती वाटत आहे.
राज्यातील विभाग, एकूण साखर कारखाने, गाळप व साखरेचे उत्पादन आकडेवारी मेट्रिक टनात पुढीलप्रमाणे : कोल्हापूर – (२६ सहकारी व १४ खाजगी कारखाने), (१ कोटी ९८ लाख मे. टन गाळप), (२२ लाख ३७ हजार मे. टन साखर उत्पादन), (उतारा ११.३० टक्के), पुणे- (२५ सहकारी व ११ खाजगी) (१ कोटी ८२ लाख ७६ हजार) (१८ लाख ७० हजार), (उतारा १०.२३ टक्के), सोलापूर- (१९ सहकारी, ३१ खासगी), (१ कोटी ८१ लाख १७ हजार), अ.नगर- (१६ सहकारी ११ खासगी) (१ कोटी ८ लाख ६१ हजार), (१० लाख ४५ हजार), (उतारा ९.६२ टक्के), छत्रपती संभाजीनगर- (१३ सहकारी व ९ खासगी) (८० लाख १२ हजार), (६ लाख ९० हजार), (उतारा ८.६१ टक्के), नांदेड- (१० सहकारी व १९ खासगी) (९५ लाख ७७ हजार), (९ लाख ४८ हजार), अमरावती- (१ सहकारी ३ खासगी) (८ लाख २ हजार) (७३ हजार), (उतारा९.१४ टक्के) नागपूर – (४ खासगी) (२ लाख ६१ हजार) (१३ हजार) (उतारा.५.२९ टक्के)