सोलापूर : येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याने यंदा, २०२३-२०२४ या गळीत हंगामात १२ मार्च २०२४ अखेर ९ लाख ८६ हजार १०० मे. टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्याने आतापर्यंत ९ लाख ६० हजार ९०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. मार्गदर्शक संचालक व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली.
यंदा कारखान्याचा गळीत हंगाम १ नोव्हेंबर २०२३ रोजी सुरू झाला. आजअखेर उत्पादित झालेल्या ९ लाख ७१ हजार १७१ व्या साखर पोत्याचे पूजन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे हस्ते झाले. तर बगॅसवर आधारीत ३३ मे. वॅट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या वीज विक्री युनिटचे पूजन कारखान्याचे संचालक संग्रामसिंह जहागिरदार यांचे हस्ते झाले. कारखान्याने ४ कोटी ५५ लाख ५५ हजार ५५५ युनिट वीज विक्री केली आहे. साखर उतारा सरासरी बी-हेवीसह १०.७६ टक्के आहे. को-जन वीज निर्मिती प्रकल्पातून १२ मार्चअखेर ७ कोटी ९७ लाख ४३ हजार ९१८ युनीट वीज निर्मिती झाली आहे अशी माहिती देण्यात आली.
यावेळी व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालक लक्ष्मण शिंदे, विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, महादेव क्षीरसागर, भीमराव काळे, अमरदिप काळकुटे, गोविंद पवार, सुभाष कटके, जयदिप एकतपुरे, रामचंद्र ठवरे, तज्ज्ञ संचालक, प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत पाटील, सुजाता शिंदे आदी उपस्थित होते.