देशात यंदाच्या हंगामात विक्रमी साखर उत्पादन होण्याचे अनुमान आहे. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये उत्पादनाची गती संथ आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा उत्तर प्रदेशात कमी साखर उत्पादन झाले आहे.
सरकारी आकडेवारीनुसार ६ एप्रिल २०२२ पर्यंत राज्यात ८९१.०१ लाख टन ऊस गाळप करुन ९०.०६ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत हे उत्पादन कमी आहे. गेल्या हंगाात १०२७.५० लाख टन ऊस गाळप करुन ११०.५९ लाख टन ऊस गाळप झाले होते.
तर या हंगामात महाराष्ट्र आणि कर्नाटकने ऊस आणि साखर उत्पादनात चांगली कामगिरी केली आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिसेशनने (इस्मा) दिलेल्या माहितीनुसार, २०२१-२२ या हंगामात महाराष्ट्रात ३१ मार्च २०२२ पर्यंत ११८.८१ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. तर गेल्या हंगामात याच कालावधीत १००.४७ लाख टन साखर उत्पादीत करण्यात आली होती. कर्नाटकमध्ये ३१ मार्च २०२२ पर्यंत ७२ साखर कारखान्यांनी ५७.६५ लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ६६ कारखान्यांनी ४२.३८ लाख टन साखर उत्पादित केली होती.